तेजस एक्स्प्रेस विषबाधितांची संख्या 24
रत्नागिरी, दि. 16, आक्टोबर - कोकण रेल्वेच्या तेजस एक्स्प्रेसमधील विषबाधित प्रवाशांची संख्या 24 झाली आहे. सर्व बाधितांना चिपळूणमधील लाइफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. रेल्वे प्रशासनाकडून विषबाधितांच्या नातेवाईकांच्या निवासाची व्यवस्था रेल्वेस्थानकाजवळच करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.
याबाबत घटनास्थळावरून तसेच रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार गोव्यातील करमळी येथून तेजस एक्स्प्रेस सकाळी नऊ वाजता मुंबईकडे जाण्यासाठी निघाली. दुपारी साडेबारा वाजता ती रत्नागिरीत पोहोचली. त्यादरम्यान प्रवाशांना अल्पोपाहारासाठी गाडीत ब्रेड, आमलेट व कटलेट देण्यात आले होते. ते खाल्ल्यानंतर रत्नागिरीच्या अलीकडेच दोन प्रवाशांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यांनी रेल्वेतील टीसींना त्रास होत असल्याची माहिती दिली. त्यानुसार टीसींनी चिपळूण रेल्वेस्थानकातील अधिकार्यांना कळवून आरोग्य यंत्रणा सज्ज तयार ठेवण्याची सूचना केली. रत्नागिरी रेल्वेस्थानक सोडल्यानंतर उलट्या होत असलेल्या प्रवाशांची संख्या वाढू लागली. महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि चिमुकल्या मुलांचाही त्यात समावेश होता. प्रवाशांना त्रास सुरू झाल्याने रेल्वे अधिकार्यांची धावपळ सुरू होती. चिपळूण रेल्वे स्थानकात शासनाची तसेच खासगी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली होती. दुपारी सव्वातीन वाजता तेजस चिपळुणात पोहोचली. त्यातील बाधा झालेल्या सर्व प्रवाशांना लाइफ केअर रुग्णालयात उपाचारासाठी दाखल केले. गाडीतील सी वन, सी टू, सी फाइव्ह, सी सेव्हन या डब्यांमधील प्रवाशांना उलट्यांचा त्रास झाला. रुग्णालयात दाखल केलेल्या प्रवाशांची नावे अशी - हरीष तोमर, सांची नायक, मिनाज मोमीन, शोमिना डे, आदिती सावर्डेकर, दिनेश कुमार, अरुण भाटीया, प्रणव कुमार, रणधीर नागवेकर, राहुल मंडल, संजय पत्रा, सौरभ उबाळे, मार्टिन फर्नांडिस, शैतुन पत्रो, रईस मोमीन, सुशांत नाइक, नोमिता तिर्की, निहारिका जाधव, मोझेस डिसोझा, आरती शाह, रोहित टॅग, अशिका कुमार, नीलेश जाधव, आरब तोमर.
या घटनेची माहिती समजताच पोलिसांचा ताफा चिपळूण रेल्वेस्थानकात दाखल झाला. बाधित रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे, रेल्वेतील अन्य प्रवाशांना त्रास होण्याची शक्यता, स्थानकातील जमाव आदी कारणांमुळे गाडी थांबवून ठेवण्यात आली. मात्र सुमारे पाच वाजता गाडी सोडण्यात आली.
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत चिपळूण तालुक्यातील कळवकवणे ग्रामपंचायत निवडणूक प्रचारासाठी आले होते. दुपारी त्यांना विषबाधेची माहिती मिळताच त्यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते रेल्वे स्थानकात पोहोचले. त्यामध्ये आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम, विधानसभा क्षेत्राध्यक्ष बाळा कदम, शहरप्रमुख राजू देवळेकर, तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, उपसभापती शरद शिगवण, पंचायत समिती गटनेते राकेश शिंदे तसेच अनेक नगरसेवकांचा समावेश होता. त्यांनी मदतकार्य केले. कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनीही घटनास्थळी तसेच रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.
तेजस एक्स्प्रेस गाडीला चिपळूण येथे थांबा नाही. मडगाव, कुडाळ, रत्नागिरी, पनवेल, दादर आणि सिएसटी येथेच ती थांबते. मात्र गाडी चिपळूणमध्ये पाणी भरण्यासाठी सुमारे दहा मिनिटे थांबते. आज विषबाधेच्या प्रकारामुळे गाडी दोन तास थांबली होती. गाडीतील बाधित झालेल्या रुग्णांच्या नातवेकांची व्यवस्था रेल्वे स्थानकाजवळ सोय केली आहे. रुग्णालयात उपचार सुरू असेपर्यंत त्यांच्या जाण्या-येण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सरकारककडून झालेल्या प्रकाराची चौकशी केली जाणार आहे, असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.