Breaking News

उमाळा येथे 178 क्विंटल रेशनचे धान्य पकडले

तहसीलदार सुरेश बगळे यांची कारवाई, पुरवठा विभागात खळबळ 

बुलडाणा, दि. 19, ऑक्टोबर - अवैधरित्या गोठयात साठवून ठेवलेला अडीच लाख रुपये किमतीचा 178 क्विंटल तांदुळ तहसीलदार सुरेश बगळे व त्यांच्या पथकाने काल 16 ऑक्टोबरच्या रात्री पकडला. ही कारवाई तालुक्यातील उमाळा येथे करण्यात आली आहे. याप्रकरणी स्वस्त धान्य दुकानदाराविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे रेशनच्या मालाची अफरातफर करणार्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या उमाळा या गावात अवैधरित्या सार्वजनिक वितरण प्रणालीच्या धान्याची साठवणुक केल्या जात असल्याची गुप्त माहीती तहसीलदार सुरेश बगळे यांना मिळाली. या माहितीवरून त्यांच्यासह महसूल कर्मचार्यांनी गावात धाव घेत एका गोठ्यावर धाड टाकली. यावेळी गोठ्यातून 178 क्विंटल तांदुळ व मोठया प्रमाणावर रिकामे रेशन धान्याचा बारदाना जप्त केले आहे. बाजारमूल्य 2 लाख 50 हजार रुपये काढण्यात आले आहे.
या प्रकरणी उमाळा येथील स्वस्त धान्य दुकानदार पंडित गुलाबराव सपकाळ यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपी पंडित सपकाळ फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे मागील काही दिवसा पासून या गावात रेशनचा माल घेऊन द्वार-पोच यजनेचे वाहन गावात येत होते. त्यावेळी रेशन दुकानचा माल आला असेल, असे ग्रामस्थांना वाटत होते. त्यामुळे ग्रामस्थ याकडे दुर्लक्ष करीत होते. आलेल्या मालाचे सरकारी पोते बदलून हा माल इतर पोत्यात भरून तो रात्री दुसर्या वाहनाने बाहेर जिल्ह्यात विकण्यात येत होता. एकंदरीत रेशनचा हा माल काळ्या बाजारात विकण्यासाठी येथे आनल्या जात होता, अशी माहिती विश्‍वसनिय सुत्राकडून मिळाली आहे.
आता बुलडाणा गोदामाची व चालू महिन्यात कोणत्या रेशन दुकानदाराच्या नावावर किती धान्यची उचल गोदामातुन दाखवली आहे, या बाबीची चौकशी होने अत्यंत गरजेचे आहे. याबाबत तहसीलदार सुरेश बगळे हे सखोल चौकशी करीत आहेत.