सभेत गोंधळ घातल्याप्रकरणी 15 शिक्षकांना जिल्हा परिषदेची नोटीस
अहमदनगर, दि. 11, ऑक्टोबर - नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सभेत गोंधळ घातल्या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आणखी 15 शिक्षकांना नोटीसा बजावल्या असून खुलासा करण्याचा आदेश दिला आहे.या पूर्वी जिल्हा परिषदेने 13 शिक्षकांना नोटीसा बजावल्या आहेत.त्यामुळे आता एकूण 28 शिक्षकांवरील कारवाईची सर्वांना प्रतिक्षा आहे.सर्व शिक्षकांकडून लेखी खुलासा मिळाल्यानंतर लवकरच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने कारवाई बाबत निर्णय घेणार आहेत.
24 सप्टेंबर रोजी (रविवारी )अहमदनगर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जोरदार हंगामा,मारहाण,शिवीगाळ करून धिंगाणा केल्या प्रकरणी कोतवाली पोलीसांनी बँकेचे अध्यक्ष रावसाहब रोहोकले सहीत एकूण 15 शिक्षकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून रात्री उशीरा ताब्यात घेतलेल्या सर्व शिक्षकांना सोडून दिले होते.अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष रावसाहब रोहोकले,बाजीराव मोढवे,राजेंद्र जायभाये,विजय जाधव,राजेंद्र ठोकळ,रावसाहेब हराळ,रामदास गव्हाणे,संजय धामणे,बाळासाहब कदम,भाऊसाहब कराळे,भाऊराव राहिंज,देवेंद्र आंबेकर,योगेश थोरात, शिवाजी आव्हाड,संतोष तांबे यांच्यासहीत तीन महिला शिक्षकांना सभेच्या ठिकाणी ताब्यात घेतल होते.शिक्षक बँकेच्या सभेच्या वेळी सत्ताधारी व विरोधी सभासदांच्या मध्ये जोरदार हंगामा झाल्यामुळे कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभय परमार यांनी सभेत गोंधळ घालणार्या शिक्षकांना समजावण्याचे वारंवार प्रयत्न करूनही शिक्षक शांत होत नसल्याने अखेरीस शिक्षकांना ताब्यात घेण्याची कारवाई के ली होती.त्यावेळी समाजातील सर्व थरांमधून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.जिल्हा परिषदेने देखील पोलीसांकडून माहिती घेऊन संबंधित शिक्षकांना तातडीने नोटीसा बजावल्या आहेत.दरम्यान शिक्षक बँकेच्या सभेत करण्यात आलेल्या व्हिडिओ चित्रीकरणाची प्रत उपलब्ध झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सभेत गोंधळ घालणारे 15 शिक्षक शोधून काढले असून या सर्वांना आता नव्याने नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत.त्यामुळे नोटीसा पाठविलेल्या शिक्षकांची संख्या 28 इतकी झाली असून शिक्षण विभागाला या शिक्षक ांकडून येणा-या लेखी खुलाशाची प्रतिक्षा आहे.शिक्षकांचा लेखी खुलासा प्राप्त होताच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने कारवाई बाबत निर्णय घेणार आहेत.