Breaking News

आयुर्वेदशास्त्रावरील विश्‍वास वाढविण्यासाठी प्रयत्न करा - डॉ. मिलींद भोई

पुणे, दि. 18, ऑक्टोबर - भारताला आयुर्वेद शास्त्राची मोठी परंपरा लाभली आहे. सध्या संपूर्ण जगाला आयुर्वेदशास्त्राची गरज आहे. परंतु समाजातील काही लोक आयुर्वेदशास्त्राचा  चुकीच्या पध्दतीने प्रसार करत आहेत आणि त्यामुळे आयुर्वेदावरील लोकांचा विश्‍वास कमी होत आहे. या चुकीच्या प्रसारामुळे आयुर्वेद शास्त्राची चांगली वैशिष्ट्ये झाकली जातात.  आयुर्वेदशास्त्र वाढविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले तर लोकांचा आयुर्वेदावरील विश्‍वास वाढेल, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलींद भोई यांनी केले.
विश्‍वानंद केंद्राच्यावतीने धन्वंतरी जयंतीनिमित्त महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. यावेळी इंटरनॅशनल आयुर्वेद अ‍ॅकॅडमीचे संचालक डॉ.सुभाष रानडे, कर्नल महेश चंदर (निवृत्त), कें द्राचे कार्यकारी विश्‍वस्त राजकुमार चोरडिया, मधुबाला चोरडिया, विश्‍वानंद केंद्र अ‍ॅकॅडमीचे शाखा प्रमुख डॉ. गिरीष सरडे, केंद्राचे वैद्यकिय संचालक डॉ. अजित मंडलेचा, डॉ. अभिजीत  जिंदे, मानसी जिंदे, डॉ. नितीन बोरा आदी उपस्थित होते. महायज्ञाचे विधी मंदार खळदकर गुरूजी यांनी केले. यावेळी विश्‍वानंद केंद्रातर्फे प्रकाशित केल्या जाणार्‍या त्रैमासिकाचे प्रक ाशन करण्यात आले. भोई म्हणाले, सध्या वाढत्या जाहीरात विश्‍वात आयुर्वेद शास्त्राचा चुकीच्या पध्दतीने प्रसार केला जात आहे. चुकीच्या पध्दतीने होणारा प्रसार थांबला, तर  जगभरात आयुर्वेद शास्त्राची नक्कीच खूप प्रगती होईल. आयुर्वेद शास्त्रशुध्दपणे व अभ्यासपूर्वक लोकांसमोर मांडले तर भारतातच नाही तर संपूर्ण जगात आयुर्वेदाचा चमत्कार घडेल,  असेही त्यांनी सांगितले. डॉ. अजित मंडलेचा म्हणाले, विश्‍वानंद केंद्रातर्फे आयुर्वेदाचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी विविध वैद्यकीय कार्यशाळा राबविल्या जातात. धन्वंतरी दिनानि मित्त जनसामान्यांच्या चांगल्या आरोग्याची प्रार्थना करण्यासाठी केंद्रातर्फे महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. यंदाचे हे सातवे वर्ष आहे. या यज्ञातील उर्जेमुळे लोकांचे आरोग्य चांगले  रहावे, तसेच याचे चैतन्य बाराही महिने टिकावे अशी प्रार्थना केली जाते.