Breaking News

बाभळी बंधा-याचे 14 दरवाजे न्यायालयाच्या निकालानुसार बंद करणार

नांदेड, दि. 29, ऑक्टोबर - धमार्बाद तालुक्यातील बाभळी बंधा-याचे 14 दरवाजे 29 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ञिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत बंद  करण्यात येणार आहे. या बंधा-यात सध्यस्थितीत 1.362 दशलक्ष घनमीटर अथवा अडीच मिटर एवढा उपलब्ध पाणी साठा अडविण्यात येणार आहे. देशभरात गाजलेल्या महाराष्ट्र व  तेलगंणा राज्यातील बहुचर्चित बाभळी बंधा-याचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहचल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार बंधा-याचे दरवाजे दरवर्षी 1 जुलै ते 28 ऑक्टोबर या  पावसाळ्याच्या कालावधीत उघडे राहतील व 29 आँक्टोबर ते 30 जूनपर्यंत दरवाजे बंद राहतील. या कालावधीत उपलब्ध असलेल्या जलसाठ्यापैकी 1 मार्च रोजी 0.6 टिएमसी  पाणी तेलगंणा राज्यात सोडण्यात यावे असा निकाल दिला. त्यानुसार याबाबत सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत ही कार्यवाही करण्यात येत  आहे.त्यानुसार 29 ऑक्टोबर रोजी बंधा-याचे दरवाजे बंद करून उपलब्ध 1.362 दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा अडविण्यात येणार आहे.बाभळी बंधारा होऊन व त्याचे  उदघाटन 29 ऑक्टोबर 2013 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. तेव्हा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे बंधा-यात जलसाठा उपलब्ध  होता पण त्यानंतर गेल्या चार वर्षात अल्प पाऊस असल्याने कोरडेच दरवाजे बंद उघडणे होत होते. मात्र यंदा चांगला पाणीसाठा उपलब्ध असल्याने या घटनाक्रमाला महत्त्व प्राप्त  झाले आहे.