Breaking News

हौशी मराठी राज्य नाट्यस्पर्धा 13 नोव्हेंबर पासून; नागपूर केंद्रात प्राथमिक फेरी

नागपूर, दि. 27, ऑक्टोबर - महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे 57 व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे नागपुरात आयोजन करण्यात आले  आहे. नागपुरातील सायंटिफीक सभागृहात आयोजित या स्पर्धेमध्ये नागपूर केंद्रातून 21 नाट्यसंघ सहभागी झाले आहेत. त्यामध्ये भंडारा आणि नक्षतग्रस्त गडचिरोली येथील संघांचाही समावेश आहे.
आगामी 13 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता विश्‍वोदय बहुउद्देशीय जनकल्याण संस्थेद्वारे सादर होणार्या ’नजरकैद’ नाटकाद्वारे स्पर्धेच्या प्राथमिक फेरीस प्रारंभ होणार आहे.  त्यानंतर 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता उडान एक झेप संस्थतर्फे ’सरासर’ नाटक सादर होईल. 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता टिळक नगर महिला मंडळ  नाट्यतरंगच्या वतीने ’पंचक’ आणि संध्याकाळी 7 वाजता तन्मयी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने ’रक्षन्ती रक्षन्ती’ 16 नोव्हेंबर रोजी स्वानंद सांस्कृतिक मंडळाद्वारे ’माझ्या  छत्रीचा पाऊस ’, 17 नाव्हेंबर रोजी शील कलासागरतर्फे ’बेघर’, 18 नोव्हेंबर रोजी शेषशक्ती पिंपळकर यांच्याद्वारे ’कैद.. एक वीर गाथा’ 20 नोव्हेंबर रोजी संजय भाकरे  फाउंडेशनतर्फे ’बाप हा बापच असतो ’ व राष्ट्रभाषा परिवारतर्फे ’आणि शेवटी प्रार्थना ’ 21 नोव्हेंबर रोजी रंगरसियातर्फे ’प्लॅटफॉर्म नं’, रंगभूमीद्वारे ’सापत्नेकराचं मूल ’, 22 नोव्हें बर रोजी रूखमाई सेवा मंडळद्वारे ’एक सुगंधी प्राजक्त ’ व मोहम्मद रफी फॅन्स कल्चरल ऑर्गनाझेशनद्वारे ’सेलिब्रिटी ’ 24 नोव्हेंबर रोजी जे. डी. कॉलेज इंजिनिअरिंग मॅनेजमेंटतर्फे  ’तीस तेरा ’ 26 नोव्हेंबर डॉ. राजेंद्र प्रसाद युवा कल्याणकारी संस्थातर्फे ’बुद्ध नको युद्ध हवा ’ व सी. पी. अँण्ड बेरार महाविद्यालयतर्फे ’अनोळखी ओळख’, 27 नोव्हेंबर रोजी  बुद्धीस्ट थिएटरतर्फे ’विठाबाई ’, 28 नोव्हेंबर रोजी बहुजन रंगभूमीतर्फे ’हिटलर की आधी मौत ’ 29 नोव्हेंबर रोजी असर फाऊंडेशनतर्फे ’महापात्रा ’ व आदिवासी बहुउद्देशीय लोक कला संस्थेतर्फे ’का? ’ या नाटकांचे सादरीकरण होईल.