Breaking News

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई, दोन वाहने जप्त

जळगाव, दि. 31, ऑक्टोबर - एरंडोल तालुक्यात वाळूचे ठेके बंद असतानाही विनापरवाना वाहतूक करणार्‍या दोन वाहनधारकांवर महसूल विभागाने दंडात्मक कारवाई केली. या क ारवाईमुळे तालुक्यात अवैध वाळू माफिया सक्रीय झाल्याचे समोर आले आहे.
याबाबत महसुल विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 29 आणि 30 ऑक्टोबर रोजी महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांनी वाळूची अवैध वाहतूक करणारे जळगाव येथील नसीर तडवी  (चालक मालक) हा आपल्या ताब्यातील ट्रॅक्टरने (एमएच 19, 7183) उत्राण विभागातील गिरणा नदीच्या पात्रातून एक ब्रास अवैध वाळू चोरून नेत होता. महसूल विभागाच्या क र्मचार्‍यांनी त्याचे ट्रॅक्टर त्यातील एक ब्रास वाळू जप्त करीत त्याला 20 हजार 400 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
दुसर्‍याकारवाईत विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने उत्राण येथील संतोष पाटील (मालक चालक) हा उत्राण विभागातील गिरणा नदीच्या पात्रातून एक ब्रास अवैध वाळू चोरून नेत असताना  महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांना आढळून आला. त्यांनी ट्रॅक्टरमधील अवैध वाळू ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त करून 20 हजार 400 रुपयांचा दंड ठोठावला.