तब्बल 1 महिन्यानंतर हनीप्रीत जगासमोर करणार सरेंडर
नवी दिल्ली, दि. 03, ऑक्टोबर - डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला शिक्षा झाल्यानंतर फरार झालेली त्याची दत्तक मुलगी हनीप्रीत अखेर समोर आली आहे. पोलिसांना सातत्याने चकवा देत असलेली हनीप्रीत मंगळवारी 38 दिवसांनंतर न्यूज चॅनलवर आली आणि आपण निर्दोष असल्याचा दावा केला.
राम रहीमही निर्दोष असल्याचं सांगत, मी त्यांना वडिलांप्रमाणे मानते आणि आमचं नातं अतिशय पवित्र आहे, असं ती म्हणाली. तसंच बदनामी करण्यासाठी माझ्यावर आरोप लावले जात असल्याचं तिने सांगितलं. न्यायालयीन सल्ला घेतल्यानंतर आपण पंजाब-हरियाणा हायकोर्टात हजर राहणार असल्याचंही हनीप्रीतने सांगितलं आहे. हनीप्रीतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे. पंचकुलामध्ये हिंसा भडकावण्याच्या आरोपाखाली हनीप्रीतविरोधात सेक्टर-5 पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. साध्वींवरील बलात्कारप्रकरणात दोषी ठरवल्यानंतर राम रहीमला पोलिस कोठडीतून पळवण्याचा कट हनीप्रीतने रचला होता, असा आरोप आहे.