हैदराबादमध्ये पावसाचा हाहाकार
हैदराबाद, दि. 03, ऑक्टोबर - आंध्र प्रदेशची राजधानी हैदराबादमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. शिवाय शहरात पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूकही विस्कळीत झाली. घरांमध्येही पाणी शिरलं आहे.
पावसामुळे शहरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसामुळे आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. मृतांमध्ये चार महिन्यांचा एक मुलगा आणि त्याच्या वडिलांचा समावेश आहे. संरक्षक भिंतीचा भाग घरावर पडल्याने मुलगा आणि त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. तर विजेच्या धक्क्याने आणखी एक जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पहाटे 4.30 ते सकाळी 8.30 या काळात 67.6 मिमी पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.