Breaking News

सदर बझारमध्ये कच-याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात


सातारा, २९ सप्टेंबर, : सदर बझारच्या नागरिकांचे आरोग्य घाणीमुळे धोक्यात आले आहे, तब्बल 8 ठिकाणच्या कचरा कुंड्यामधील कचरा कुंडीतून ओसंडून वाहत आहे.खाली सांडलेल्या कच-याने कुंडीभोवती भटक्या कुत्र्यांचा आणि डुकरांचा वावर वाढला आहे, घाणीचे साम्राज्य पसरल्याने परिसरात साथीच्या आजारांचे प्रमाणात वाढ झाली आहे, वारंवार तक्रार करूनदेखील आरोग्य खात्याकडून कानाडोळा केला जात आहे.आरोग्य अधिका-यांच्या मनमानी कारभारामुळे स्थानिक नगरसेवक हतबल झालेले दिसत आहेत, नगरपालिकेच्या आरोग्याच्या मिटींगला कचरा भरणा-यांचे आणि ठेकेदाराचे बिलं काढली जातात कशी याची सखोल चौकशी करण्यात यावी? सदर बझारचा मुकादम कधी बोलका होणार? भरलेल्या कुंडीची वाहतूक न करता त्यांची बिले कशी काय काढली जातात? अधिकारी आणि ठेकेदार यांचे मिलीभगत काय?
प्रभागात सॅनिटरी इन्स्पेक्टर गैरहजर राहिल्याने त्यांचे एक महिन्याचे वेतन कापण्यात यावे अशी मागणी संतप्त नागरिक करीत आहेत. सदर बझार येथे मोठ्या प्रमाणात दुर्गउत्सव साजरा केला जातो,भारतमाता मंडळ यंदाच्या वर्षी सुवर्णमोहत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे त्यानिमित्ताने येथे जिल्ह्यातूनच नाहीतर परराज्यातील भाविक दर्शनासाठी रांगा लावत आहेत. मंत्री, खासदार, आमदार सिनेअभिनेते राजकीय नेते यांनी मंडळास भेट दिली आहे आणि अशा स्थितीत प्रभागाची अस्वच्छ छाप पाडण्याचे काम आरोग्य खात्याकडून होत आहे.