Breaking News

चेंगराचेंगरी प्रकरण : मृतांचा आकडा २२वर; जखमींना रक्ताची गरज


मुंबर्इ, २९ सप्टेंबर, : एल्फिन्स्टन आणि परळ या रेल्वे स्थानकांना जोडणा-या पुलावरील चेंगराचेंगरी प्रकरणातील मृतांचा आकडा २२वर पोहोचला आहे. आज सकाळी ११.४५च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत सुमारे ३२-३५ प्रवाशी जखमी झाले असून त्यांच्यावर केर्इएम रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींना रुग्णालयात रक्ताची गरज असून ए पॉझिटिव्ह, एबी पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह आणि एबी निगेटिव्ह या रक्तागटाच्या लोकांनी रक्त देण्यासाठी लवकरात लवकर रुग्णालयात यावे, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या घटनेसंदर्भात २४१३६०५१, २४१०७०२०, २४१३१४१९ हे हेल्पलार्इन क्रमांक जारी करण्यात आले आहेत.