Breaking News

स्वस्त धान्य दुकानदारांना दसर्‍यापूर्वी माल द्यावा!

बुलडाणा, दि. 24, सप्टेंबर - शहर व तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना दसर्‍यापुर्वी रेशनचा माल उपलब्ध करुन देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र पंचायत परिषदेच्या वतीने एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.  निवेदनात नमुद केल्यानुसार खामगाव तालुक्यासाठी माहे सप्टेंबर 2017 चे रेशन माल नियतन प्राप्त झालेले असतांना सुध्दा अद्यापपर्यंत स्वस्त धान्य दुकानदारांचे धान्य मागणी पत्र मंजुर करण्यात आले नाही. दसरा सण तोंडावर येवून ठेपला असून तहसीलदार सुनिल पाटील व निरीक्षण अधिकारी शैल वट्टे यांच्या हेकेखोरे वृत्तीमुळी स्वस्त धान्य दुकानदारांची अडवणुक होत आहे.  तालुक्यात दक्षता समिती स्थापना झालेली नसतांनाही विनाकारण दुकानदारांना दक्षता समितीचे प्रमाणपत्र असल्याशिवाय धान्य मागणी मंजुर करणार नाही, असे सांगितल्या जात आहे. मागील चार-पाच दिवसापासुन तहसिल कार्यालय आवारात केरोसिनचे टँकर वाटपाच्या प्रतिक्षेत उभे आहे.   महसुल व पुरवठा अधिकार्यांच्या वादामध्ये नाहक स्वत धान्य दुकानदार यांच्यासोबत रेशनकार्डधारकांना दसरा सणाला रेशन मालापासुन वंचित राहण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे.
तरी याबाबत गांभीयार्ने विचार करुन स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य व केरोसिन उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र पंचायत परिषदेचे प्रा.सुधीर सुर्वे व प्रा. अनिल अमलकार यांनी केली आहे.