Breaking News

31 ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य करा; अन्यथा बेमुदत संप

महाराष्ट्र सफाई मजदूर व जनरल कामगार युनियनचा इशारा

बुलडाणा, दि. 24, सप्टेंबर - संघटने बरोबर केलेल्या करारनाम्यानुसार कोणत्याच प्रकारच्या मागण्या पूर्ण करण्यात आलेल्या नाहीत 31 ऑक्टोंबर 2017 च्या पूर्वी मान्य न झाल्यास सफाई कामगार बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा महाराष्ट्र सफाई मजदूर व जनरल कामगार युनियन शाखा शेगांव ने मुख्याधिकारी यांना एका नोटीशीद्वारे देण्यात आला आहे.
यामध्ये पुढे नमुद आहे की औद्योगिक विवाद अधिनियम कलम-22 पोट कलम -1 मधील तरतुदीप्रमाणे मागण्या पूर्ण करकण्यात आलेल्या नाहीत. ही बाब कामगारांच्या हिता विरुध्द आहे. मागण्या मान्य न झाल्यास दि.1 ऑक्टोबर पासून नगर परिषद कार्यालयासमोर दोन-दोन सफाई कामगार साखळी उपोषणाकरीता बसणार आहेत. मागण्या मंजूर न झाल्यास टप्या-टप्याने आंदोलन करण्यात येईल.या नंतर कामगार बेमुदत संपावर जातील. व याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याधिकारी व न.प.प्रशासनावर राहील. संपादरम्यान रोजंदारी सफाई कामगार व नविन सफाई कामगार कामावर राहतील असे नमुद आहे. तसेच 24 सफाई कामगारांपैकी 1 सफाई कामगाराचे पत्नीला वारसाहक्काची नोकरी दिलेली आहे. त्यानुसार इतर कामगारांनासुध्दा मा.आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे 24 सफाई कामगारांमधील सेवानवृत्त झालेल्या कामगारांच्या वारसांना त्वरीत नोकर्‍या देण्यात याव्यात. सर्व सफाई कामगारांना गणवेश देण्यात यावेत, सफाई कामगारांना संपकाळातील पगार साप्ताहिक सुटीमध्ये समाविष्ट करण्यात येवून त्यांचे पगाराची भरपाई करण्यात यावी.
अशा विविध मागण्यांची नोटीस मुख्याधिकारी यांना देण्यात आली असून पंतप्रधान, मुख्यमंत्री, नगर विकास मंत्री, प्रधान सचिव,नगर विकास विभाग, पालकमत्री, प्रादेशीक संचालक, अमरावती, जिल्हाधिकारी, याच्यासह आमदार, खासदार, उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, ठाणेदार, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, न.प.शेगांव, तसेच संबधित युनियनचे पदाधिकारी यांना प्रतिलीपी देण्यात आल्याचे युनियन अध्यक्ष, प्रकाश बग्गण, सचिव, रामु सारवान यांनी सांगितले.