Breaking News

ना.नितीन गडकरींकडून ‘तरुणाई फाउंडेशन’चा गौरव

बुलडाणा, दि. 24, सप्टेंबर - घट स्थापनेच्या दिवशी केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते खामगाव येथील तरुणाई फाउंडेशन च्या सेवा कार्याचा गौरव करण्यात आला. गांधी सागर तलावाजवळील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात निधी सर्मपण या भव्य सोहळ्यात महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांना आमंत्रित करण्यात आले होते. 
तरुणाईच्या वतीने राजेंद्र कोल्हे, उमाकांत कांडेकर यांनी सन्मान स्वीकारला. तळागाळातील लोकांसाठी सेवा कार्य करणार्या 110 संस्थांची निवड स्वत: ना. गडकरी यांच्या कडून झाली. त्यात खामगाव येथील तरुणाई फाउंडेशन चा समावेश होता हे विशेष. या सोहळ्याला राज्यातील नामवंत उपस्थित होते. ना. गडकरी यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती सोहळयात भाजपा जनप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी त्यांना मोठा निधी दिला होता त्यात तेवढाच निधी टाकून तो प्रामाणिकपणे काम करणार्‍या  समाजसेवी संस्थांना सर्मपित करू असा संकल्प गडकरींनी केला होता. त्या निमित्ताने 21 सप्टेंबर ला निधी सर्मपण हा आगळा वेगळा सोहळा घेण्यात आल्याचे प्रास्ताविकात आमदार अनिल सोले यांनी सांगितले.
या वेळी ना. गडकरी यांनी प्रामाणिक कार्य करणार्‍या सेवाभावी संस्थाच्या आपण सोबत राहू असे त्यांनी शेवटी सांगितले.  या कार्यक्रमात तरुणाईचे अध्यक्ष नारायण पिठोरे, अविनाश सोनटक्के यांची उपस्थिती होती.