Breaking News

राणेंबाबतच्या फलकबाजी प्रकरणी शिवसेनेच्या अरविंद भोसलेंविरोधात गुन्हा दाखल

मुंबई, दि. 26, सप्टेंबर - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह फलक लावल्याप्रकरणी शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले यांच्या विरोधात वरळी  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फलकात अनेक आक्षेप घेण्याजोग्या अनेक बाबी आहेत, असे सांगत काँग्रेस कार्यकर्त्यांनी या प्रकरणी तक्रार  केली होती. तक्रार नोंदवून घेतल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला आणि फलक लावण्यात आलेल्या परिसरात दुकानदारांकडून अधिक माहिती  घेऊन गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. राणे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावरून राणे आणि शिवसेना यांच्यात काही काळापासून तणावाचे  वातावरण आहे. या प्रकरणामुळे आता शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील वाद चिघळण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.