Breaking News

बकरी ईद निमित्त राज्यपालांच्या जनतेला शुभेच्छा

नवी दिल्ली, दि. 02, सप्टेंबर - बकरी ईद निमित्त राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. बकरी ईद (ईद उल झुहा) हा  पवित्र सण समर्पणभाव, श्रद्धा व त्याग या शाश्‍वत मूल्यांचे स्मरण देतो. बकरी ईदचा सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद, प्रगती व समृद्धी घेऊन येवो, अशी शुभ कामना  मी या प्रसंगी करतो, असे विद्यासागर राव म्हणाले.तसेच राज्यातील जनतेला, विशेषतः मुस्लीम बंधू - भगिनींना बकरी ईद निमित्त हार्दिक शुभेच्छा असेही ते  आपल्या संदेशात म्हणाले आहे.