सातारा जिल्ह्यातील जुन्या बंधार्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य
सातारा, 09 - जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसर्या टप्प्यातील निवडलेल्या गावांतील जुने पाझर तलाव, बंधारे यांच्या दुरुस्तीला प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच लोकांच्या व जनावरांच्या पिण्याची गरज भागविण्याच्या उपायावर विशेष भर देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू असून जुन्या बंधार्यांमधील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील कामे मार्चपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांनी दिल्या आहेत. त्याबरोबरच नव्याने निवड झालेल्या 210 गावांतील शिवारफेरी व कामांची निवड निश्चित होऊन गावनिहाय आराखड्यांना मान्यताही देण्यात आली आहे. आराखड्यातील कामांपूर्वी गावातील जुन्या कामांच्या दुरुस्तीवर विशेष भर दिला जाणार आहे. यामध्ये जुने गाळाने भरलेले पाझर तलाव, माती नालाबांधातील गाळ काढण्याला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी लोकसहभागातून मशिनरी उपलब्ध करून कामे करायची आहेत. जुन्या कामांची दुरुस्ती झाल्यानंतर यातील टंचाईग्रस्त गावांत लोकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यावर विशेष भर राहणार आहे. यामध्ये जुने जलस्त्रोतांची स्वच्छता, वि
हिरींचा गाळ काढणे, कूपनलिकांच्या दुरुस्ती करण्यावर भर दिला जाणार आहे.