Breaking News

1984 दंगल : खटल्यांच्या फेरतपासासाठी दोन निवृत्त न्यायाधिशांची समिती

नवी दिल्ली, दि. 02, सप्टेंबर - 1984 मध्ये झालेल्या शीख विरोधी दंगलीशी संबंधित बंद करण्यात आलेल्या 199 खटल्यांच्या फेरतपासासाठी सर्वोच्च न्यायालयाने  आज दोन निवृत्त न्यायाधिशांची समिती स्थापन केली. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. के.एस. राधाकृष्णन व न्या. जे.एम. पांचाळ यांचा समावेश आहे.या  समितीचे काम 5 सप्टेंबरपासून सुरू होणार असून तीन महिन्यांत त्यांना अहवाल सादर करायचा आहे. शीख विरोधी दंगलीशी संबंधित 199 खटल्यांचा तपास बंद  करण्याचा निर्णय विशेष तपास समितीने दिला होता. हा निर्णय योग्य होता की अयोग्य, या बरोबरच या प्रकरणांचा तपास पुन्हा सुरू करावा की नाही, या संदर्भातील  विस्तृत अहवाल समितीला सादर करायचा आहे. यामध्ये समिती 199 खटल्यांबरोबरच 42 अन्य प्रकरणांचाही तपास करणार आहे, असे सरन्यायाधीश दीपक मिश्रा  यांच्या खंडपीठाने सुनावणी दरम्यान स्पष्ट केले.