Breaking News

सह्या घेऊन मुनीमने 21 लाखांस फसवले

सोलापूर, दि. 30, सप्टेंबर - दत्तनगर येथील चिलका कारखान्यातील एका कामगाराने 20 लाख 99 हजार रुपयांना गंडवले. ही घटना एप्रिल ते सप्टेंबर 2015 या कालावधीत घडली आहे. व्यंकटेश सिद्रामप्पा चिलका (रा. भद्रावतीपेठ) यांनी जेल रोड पोलिसात तक्रार दिली आहे. रमेश गणपत नल्ला (वय 40, रा. दत्तनगर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. चिलका हे कारखान्यात व्यवस्थापक म्हणून काम करतात. ते पाच-सहा महिने आजारी होते. त्यावेळी नल्ला याने बनावट कागदपत्र तयार करून त्यावर सह्या घेतल्या. कोर्‍या चेकवरही सह्या घेतल्या. कारखान्यातील कच्चा माल तयार झालेले साहित्यही परस्पर विकले. त्याचे पैसेही स्वत:च वापरले. चेकद्वारे साहित्य विकून आलेल्या पैशाचा अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत चिलका यांनी सुरुवातीला पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. चौकशी केल्यानंतर सत्यता पडताळून गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.