Breaking News

‘स्वच्छ भारत-स्वच्छ विद्यालय’ राष्ट्रीय पुरस्कारासाठी कुरतडे शाळेची निवड

रत्नागिरी, दि. 01, सप्टेंबर - केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत- स्वच्छ विद्यालय’ उपकमात रत्नागिरी जिल्हा परिषदेची कुरतडे (ता. रत्नागिरी) यशस्वी ठरली  असून शाळेची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. देशभरातून निवडलेल्या 172 शाळांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील या एकमेव शाळेची निवड झाली असून त्याचे  वितरण येत्या उद्या शुक्रवारी (1 सप्टेंबर) नवी दिल्लीत होणार आहे.
हा पुरस्कार मानव संसाधन मंत्रालयाच्या वतीने दिला जातो. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश पवार, केंद्रप्रमुख उदय शिंदे तसेच एक  विद्यार्थी दिल्लीला रवाना झाले आहेत.
‘स्वच्छ भारत- स्वच्छ विद्यालय’ हा केंद्र शासनाचा उपक्रम प्रत्येक शाळेत राबविला जात आहे. केंद्र शासनामार्फत नुकतीच देशात प्रत्येक शाळेची पाहणी करण्यात  आली. त्यानंतर देशातून 172 शाळांची निवड करण्यात आली. त्यामध्ये कुरतडे येथील शाळेचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधून एकमेव शाळा राष्ट्रीय स्तरावर  निवडली गेल्याने जिल्ह्याभरातून शाळेचे कौतुक होत आहे.