Breaking News

जनऐक्य व जनसेवा हा खरा गणेशोत्सव - डॉ. कुलकर्णी

अहमदनगर, दि. 01, सप्टेंबर - मागील 125 वर्षाच्या प्रवासात सार्वजनिक गणेश उत्सवाने आपला मूळ उद्देश आणि ध्येयवाद गमावला आहे . रस्त्यावर श्रद्धेचा  बाजार कमी तमाशा मांडण्याऐवजी 10 दिवस आपल्याच गावातील वंचित जनसमूहाचे अंधाराला जग उजळण्याचा प्रयत्न गणेश प्रेमींनी केला पाहिजे. पुण्यात  लो.टिळक ,भाऊ रंगारी , न.ची.केळकर आदिंनी सार्वजनिक गणेश उत्सव हिंदू संघटनसाठी सुरु सुरु केल्यावर 1898 पासून नगर शहरातही त्यास सुरवात  झाली.नगरच्या कापड आणि धान्य व्यापार्‍यांनी आरंभी सहयोग दिला.तत्कालीन पुढारी बाळासाहेब देशपांडे यांनी नगरच्या सर्व भागातील युवकांची मंडळे  काढली.माळीवाड्यातील गणपतीला साक्षी ठेवून नगरमध्ये बहरलेल्या गणेश उत्सवाने नगरमध्ये स्वातंत्र्य चळवळ,सामाजिक प्रबोधन,जातीभेद निर्मूलनात महत्वपूर्ण  योगदान दिले.  आज बहुतांशी गणपती मंडळाचा ताबा राजकीय पुढार्‍यांनी घेतला आहे.गणेश उत्सवाचा वापर स्वतःचे राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी  करतात.गणपतीच्या वर्गण्या कम खंडण्यांचे अर्थशास्र,जुगार चालवून गणेशभक्ती,रस्ते अडवून शहराची दुरावस्था यातून कोणते सामाजिक हित साधले जाते हा मोठा  प्रश्‍न आहे.या सगळ्यांमधून समाज एकत्र येतो कि विभाजित होतो हा अवलोकनाचा विषय आहे.नगरच्या गणेश उत्सवातून वीस कोटींची उलाढाल होते,यातून नागरच्य  खूप समस्या सुटू शकतात,नागरी सुविधा उभ्या राहू शकतात.गणेशउत्सवाचा खरा आणि मूळ उद्देश मनामनात पोहोचवणे हि काळाची गरज आहे.