Breaking News

मल्लखांब स्पर्धेत नाशिकच्या स्वराज पाटीलला सुवर्णपदक

नाशिक, दि. 27, सप्टेंबर - मुंबईतील ऐरोली मैदानावर झालेल्या महाराष्ट्र राज्य प्रादेशिक आंतरशालेय मल्लखांब स्पर्धेत नाशिक येथील अशोका युनिव्हर्सल  स्कूलमधील इयत्ता दुसरीचा विद्यार्थी स्वराज मंगेश पाटील याने मल्लखांब स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. स्वराजला यशवंत व्यायामशाळेचे क्रीडा शिक्षक यशवंत जाधव  तसेच अशोका युनिव्हर्सल स्कूलचे शिक्षक राज काळे, ऋषीकेश ठाकूर व अक्षय खानापुरे यांचे मार्गदर्शन लाभले.