Breaking News

भ्रष्टजातकुळीतील साबां आभियंता स्वच्छ पारदर्शक कारभाराच्या मार्गातील धोंडे

सरकारचं धोरण तसं चांगल, पण भ्रष्ट सार्वजनिक बांधकाम अभियंत्यांनी वेशीवर टांगलं!

दि. 27, सप्टेंबर - गाव तस चांगल पण वेशीवर टांगल अशी ग्राम्य भाषेतील एक म्हण महाराष्ट्रात प्रचलित आहे.या म्हणीचा अर्थ जो तो आपल्या कुवतीप्रमाणे  लावेल. गाव कितीही सुसंस्कारीत असलं, गावाचा कारभार कितीही सुरळीत आणि पारदर्शी असला तरी एखाद्या बदफैली कारभार्याने घाण केली तर अवघे गाव  बदनाम व्हायला वेळ लागत नाही आमच्या दृष्टीने या म्हणीचा अर्थ हा आहे. सध्या महाराष्ट्र शासन आणि सार्वजनिक बांधकाम खाते यांच्या संदर्भात याच आशयाची  एक म्हण रूढ होऊ पहात आहे... सरकारचे ध्येय धोरण तसे चांगले,पण साबांच्या भ्रष्ट अभियंत्यांनी वेशीवर टांगले...
स्वच्छ आणि पारदर्शक प्रशासनाला महाराष्ट्र शासन कटीबध्द आहे,हे धोरणातून आणि अमंलबजावणीतून स्पष्ट होते.महाराष्ट्र शासनाचे बहुतांश विभाग मुख्यमंञी देवेंद्र  फडणवीस आणि संबंधीत खात्याच्या मंञ्यांना सकारात्मक प्रतिसाद देतांना दिसत आहेत.अपवाद आहे सार्वजनिक बांधकाम खात्याचा.
सार्वजनिक बांधकाम खात्यातील भ्रष्टावळीच्या पंक्तीत मांडी घालून बसलेल्या अभियंत्यांनी महाराष्ट्र शासन विशेषतः मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक  बांधकाम मंञी चंद्रकांत दादा पाटील यांच्या स्वच्छ पारदर्शक प्रशासन या महत्वाकांक्षी ध्येयाला छेद देण्याचा नतद्रष्टपणा सुरू केला आहे.
गेल्या पंधरा वीस वर्षाच्या सवयीने भ्रष्टाचार सबां अभियंत्यांच्या अंगवळणी पडला आहे.सवयीचे रूपांतर व्यसनात होते.भ्रष्टाचार हे या मंडळींचे व्यसन बनले आहे  टेबलवर येणारी प्रत्येक फाईल दुभती गाय आहे या नजरेने पाहीले जात आहे.पुर्वी ऐखाद्या कामाचा विशिष्ट दर ठरलेला होता.कंञाटदाराला नियमात काम करून  झालेल्या नफ्यातून आभियंत्याःना स्वखुशीने देण्यात समाधान मिळत होते.आज हे समाधान अभियंत्यांमध्ये दडलेल्या भस्मासुराने हिरावून घेतले आहे.
एका कामात प्रत्येक टप्यावर ठरलेली टक्केवारी मिळाल्याशिवाय कामाच्या फाइल पुढे सरकत नाही.यातूनच फाईलला टक्केवारीची चाकं लावावी लागतात ,अशी  कुणकुण ऐकायला येते.
टक्केवारीची सुरूवात होते ती कामाची निविदा प्रसिध्द करण्यापासून.मुख्य अभियंत्यांपासून थेट शाखा अभियंत्यांपर्यत ही साखळी कार्यरत आहे.इतकेच नाही तर काही  खास प्रकरणांमध्ये सचिव दर्जाचे साबांतून बढतीवर गेलेले काही उच्चपदस्थही सहभागी असल्याची चर्चा या साखळीचे वजन सिध्द करते.निविदा प्रसिध्द करतांना  मर्जीतील कंञाटदारांना लाभ कसा देता येईल याची पध्दतशीर योजना असते.त्यानंतर काम वाटप करतांना दुसरा टप्पा सुरू होतो.मर्जीतील कंञाटदारांना काम  देण्यासाठी आवश्यक त्या सर्व क्लूप्त्या वापरल्या जातात.याचा दाखला सायन पनवेल विशेष राज्य महामार्गाच्या कामात मिळाला आहे.या संदर्भात संबंधित कार्यकारी  अभियंत्याने केलेला प्रपंच चव्हाट्यावर आला आहे. एकदा काम सुरू होऊन पुर्ण होईपर्यंत संबंधित अभियंता साइडवर फिरकतही नाही.काम पुर्णत्वाचा,गुणवत्ता  अहवालही टेबलवर तयार होतो.अखेरचा टप्पा सुरू होतो देयके मंजूर करून अदा करतांना.ठरलेली टक्केवारी मिळाल्याशिवाय कंञाटदाराला कामावर खर्च केलेली  रक्कम मिळत नाही. नियमांना अधिन राहून अटी शर्ती मान्य करून काम करणार्या प्रामाणिक कंञाटदारांना सापत्न वागणूक दिली जात आहे,खरे या भ्रष्ट अभियंत्यांचे  सरळ मार्गी कंञाटदाराप्रती असलेले वर्तन वर्णन करण्यास सापत्न भाव हा शब्दही फारच थिटा आहे.
साबांत सर्वदूर आजही ही परिस्थिती आहे.या भ्रष्टकुळातील अभियंताच मुख्यमंञी फडणवीस आणि साबांमंञी चंद्रकांत दादा पाटील यांच्या स्वच्छ पारदर्शक  कारभाराच्या मार्गातील धोंडे आहेत.
(क्रमशः)