Breaking News

ईपीएस पेन्शन धारकांच्या समस्या निकाली काढा : कमांडर राऊत

बुलडाणा, दि. 24, सप्टेंबर - मागील अनेक वर्षांपासून ईपीएस पेन्शन धारकांच्या समस्या शासन दरबारी रखडल्या आहेत. या समस्या सोडण्यासाठी शासनाच्या वतीने कोणतेच ठोस पावले उचलले जात नाहीत. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना  आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या समस्या तातडीने निकाली काढण्यात याव्यात, अन्यथा सेवानवृत्त कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने 7 डिसेंबर रोजी संसदेवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा कमांडर अशोक राऊत यांनी दिला आहे.सेवानवृत्त कर्मचार्‍यांच्या समस्या बाबत कमांडर अशोक राऊत शिष्टमंडळाने 12 सप्टेबर रोजी केंद्रीय कामगार मंत्री संतोषकुमार गंगवार यांची भेट घेवून त्यांच्याशी कर्मचार्‍यांच्या समस्यावर चर्चा केली. यावेळी त्यांनी मी कामगाराच्या बाजुने तुमच्या सोबत आहे. माझ्या अख्त्यारीत असलेले सर्व पर्याय कामगारांच्या कल्याणासाठी वापरील. तसेच माजी श्रम मंत्री यांनी दिलेली सर्व आश्‍वासने पूर्ण करण्यात येतील, असे आश्‍वासन कामगार मंत्री गंगवार यांनी दिले. यावेळी अभियंता विरेंद्रसिंग राजस्थानचे अध्यक्ष रणजितसिंग दुष्यंद हे उपस्थित होते. तत्पूर्वी कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वात केंद्रीय धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावर केंद्रीय आयुक्त यांनी आधार कार्डाच्या आधारे पेन्शन देण्याचे आदेश देण्यात येतील, असे आश्‍वासन दिले. या उपरही आश्‍वासनाची पूर्तता झाल्यास येथे मेळावा घेवून मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा कमांडर अशोक राऊत यांनी दिला.