Breaking News

जनावरांच्या लसीकरणाबाबत मार्गदर्शन

बुलडाणा, दि. 24, सप्टेंबर - येथील डॉ.राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालयाच्यावतीने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत डोंगरखंडाळा येथे नुकताच जनावराच्या विविध रोगांवर लसीकरण कार्यक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये जनावरांना होणारे विविध संसर्गजन्य आजार विविध रोगांची लक्षणे व त्यावर करण्यात येणारे प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि कृत्रीम रेतन या विषयावर पशुवैद्यकिय पर्यवेक्षक डॉ.तोडमल यांचेकडून मार्गदर्शन व माहिती देण्यात आली. 
आजारी जनावरांच्या सर्व सामान्य रोगांवर घेतली जाणारी काळजी कशी घ्यायला हवी, उपलब्ध लसी व औषधे आणि इतर माहिती या प्रात्याक्षिकाद्वारे शेतकर्यांना देण्यात आली.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.इंगोले, विषय तज्ञ आर.पाटील, कार्यक्रम अधिकारी व्ही.मेंटागळे यांचे मार्गदर्शन लाभले. संबधीत कार्यक्रमास गावकर्‍यांसह कृषीधारा ग्रुपचे योगेश खंदारे, उमेश रहाणे, शंकर नेव्हल, नयनी श्रीनिावास रेड्डी व आकाश शेंडे उपस्थित होते.