स्वत:च्याच मुलीवर बलात्कार करणार्या नराधमास अटक
अकोले, दि. 01, सप्टेंबर - वडीलांनी स्वतःच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना खडकवाडी (ता. आंबेगाव) येथे घडली. बलात्कार करणार्या नराधमाचे नाव संपत शंकर भोजने असुन त्याला मंचर पोलिसांनी बुधवार दि.30 रोजी अटक केली आहे.
खडकवाडी येथील अल्पवयीन मुलगी 11 वर्षे5 महिन्याची आहे.तिला एक बहीण असुन या दोंन्ही मुलींच्या आईचे दोन वर्षापुर्वी निधन झाले. त्यामुळे त्यांचे पालन पोषण वडील संपत शंकर भोजणे हे करतात. नराधम संपत भोजने यांनी सबंधित पिडीत मुलीवर अतीप्रसंग दोन वेळा केला.जर कोणास काही सांगितले तर तुला मारून टाकीन अशी धमकी देत होते.अती प्रसंग करताना पिडीत मुलगी ओरडल्याचा आवाज शेजारील कुटुंबांनी ऐकला. त्यानंतर दुसर्या दिवशी शेजारी राहणार्या कुटुंबाने पिडीत मुलीला विश्वासात घेऊन रात्री का ओरडली अशी विचारणा केली असता त्यावेळी तीने त्यांना माहिती दिली नाही. परंतु पिडीत मुलीला खुप वेदना झाल्याने शेजारी राहणार्या कुटुंबाला माझे वडील बलात्कार करत असल्याचे तीने सांगितले.ही बाब सबंधित कुटुंबाने पिडीत मुलीची मावशी आणि काकांना फोनद्वारे कळवले.
त्यानुसार पिडीत मुलीला विश्वासात घेऊन तिच्या मावशीने विचारपुस केली असता तिने घडलेली घटना सांगितली. मंचर पोलिस ठाण्यात नराधम संपत शंकर भोजणे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असुन त्यांना अटक केली आहे.