Breaking News

जात, जाणिवा आणि ‘सोवळयातील ब्राम्हण्यत्व’

दि. 10, सप्टेंबर - ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर देशभरात निषेधांचे सत्र सुरू झाल्यानंतर, त्यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच दुसरे मुद्दे समोर  येऊन पुरोगामी चळवळीचे लक्ष विचलित करण्याचा, आणि त्या प्रकरणांची धार कमी करण्याचा प्रयत्न होत आहे, तसाच काहीसा प्रकार पुण्यातील ‘सोवळ्यातील’  स्वयंपाक करणारी बाईला जातीअभावी शुद्र ठरवणार्‍या डॉ. मेधा खोले प्रकरण होय.
महाराष्ट्रातील शिक्षणाचे माहेरघर, पुरोगामित्वाचा वारसा जपणारे, सांस्कृतिकदृष्टया आघाडीवर असणार्‍या पुणे शहरांची ज्याप्रमाणे ओळख आहे, त्याच पुणे शहरांची  दुसरी ओळख म्हणजे, कट्टर जातीयवाद जोपासणारे पुणे. देशाच्या इतिहासात नोंद घेतल्या गेलेल्या क्रांती जशी पुण्यात झाली, तशीच प्रतिक्रांती देखील या शहराने  पाहिली आहे. मात्र आता हे शहर पुढारपणाकडे वाटचाल करत असतांना, जात लपवून श्राद्ध विधीसाठी सोवळ्यातील स्वयंपाक केला म्हणून एका बाईच्या विरोधात  गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली, आणि जातीची पकड आजही उच्चशिक्षित सुवर्णांच्या समाजमनांवर किती घट्ट आहे, याची प्रचिती आली.
पुण्यातील हवामान शास्त्र विभागाच्या माजी संचालिका, उच्चशिक्षित, विज्ञानात डॉक्टरेट मिळविळेल्या डॉ. मेधा खोले यांना आजही जात महत्वाची वाटते. डॉ. खोले  यांच्या घरी गौरी गणपती बसतात, घरी आई-वडिलांचे श्राद्ध विधीही असतात. त्यासाठी त्यांना ‘सोवळ्यातील’ स्वयंपाक करणारी सुवासिनी असलेली ब्राह्मण स्त्री हवी  होती. मात्र खोले यांना दिलेल्या माहितीनुसार त्यांनी निर्मला नावाच्या महिलेला यासाठी पाचारण केले. मात्र काही कालातरांने त्यांना कळले की ही महिला ब्राम्हण  आणि मग खोले यांना त्यांचा धर्म, त्यांची देवी देवतेची आठवण झाली, आणि त्यांचा पारा सटकला. त्यासंबधीचा गुन्हा दाखल करण्यासाठी डॉ. खोले यांनी पोलीस  स्टेशन गाठले. वरिष्ठांनी त्यांची समजूत घालून असा गुन्हा दाखल करता येत नाही, अशी समजूत घातली, मात्र खोले यांना आपल्या जातीचा अहंकार त्यांना शांत  बसू देईना. त्यांनी सगळे पोलीस स्टेशन डोक्यावर घेतल्यावर पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला. जोपर्यंत डॉ. खोले यांना स्वयंपाक करणार्‍या बाईंची जात  माहित नव्हती, तोपर्यंत त्यांना तिने केलेल्या स्वयंपाकांची रूचकर चव मिळत होती. तोपर्यंत ती सोवळयातील बाई होती. घरांतील देवांनी देखील ब्राम्हण्य बाई  नसल्यामुळे कोणताही गोंधळ घातला नाही, कोणताही देव कोपला नाही. मग असे असतांना, डॉ. खोले यांनी आंकडतांडव करण्याचे कारण काय? याचे कारण स्पष्ट  आहे. डॉ. खोले विज्ञानातील उच्चविद्याभूषित असल्या तरी त्यांना अद्याप माणूसकीचा धर्म कळला नाही, कारण त्याचे जातीचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच  मिळाले असणार. स्वयंपाक करणारी बाईचे निकष असायला हवे. ती स्वच्छ राहते की नाही, स्वयंपाक ती रूचकर बनवते की नाही, थोडक्यात सांगायचे तर तिच्या  क्षेत्रात ती प्राविण्य आहे की नाही, या निकषाकडे दुर्लक्ष करत, तिची जात शोधणारी डॉ. खोले बाई या जातीच्या उतरंडातील मोठा अडथळा आहे. अशा व्यक्तींना  संवैधानिक पदावर काम करण्यांचा कोणताही अधिकार नाही. भारतीय संविधानातील कलम 15 नुसार कोणत्याही व्यक्तीला धर्म, जात, वंश, लिंग किंवा जन्माच्या  आधारे भेदभाव करता येणार नाही, असे स्पष्ट असतांना ही बाई मनुस्मृतीच्या आधारे आपल्या जात जाणीवा जपत असतील, तर अशा व्यक्तींना कठोर शिक्षा  करण्याची गरज आहे. यांचे प्रबोधन, जागृती होणे शक्य नाही. शिक्षणांने माणसांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारतात, माणूस सुसंस्कृत होतो, मात्र आजमितीस उच्चशिक्षित  लोकांमध्ये धार्मिक कट्टरतावाद वाढत चालला आहे, त्याला ते जोपासत आहे. कारण त्यांना मिळणारे शिक्षण, विचार, आचार ब्राम्हणी मानसिकतेतून मिळत आहे.  त्यामुळे या शिक्षणांचा उपयोग आपल्या सोयीसाठी, जातीयवाद, धार्मिक कट्टरता जोपासण्यासाठी या लोकांकडून आकंडतांडव सुरू आहे. रोज नवनवीन विषय सुरू  ठेवून देशांतील मुख्य मुद्दावरून दुर्लक्ष हटवण्याचे आणि आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे कसब विशिष्ट राजकीय पक्षांनी चांगलेच जोपासले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना राज्यभिषेकांच्या वेळी जसे शुद्र ठरवून त्यांचा राज्यभिशेक प्रस्थापित ब्राम्हणांनी नाकारून त्यांना शुद्र ठरवण्यांचा प्रयत्न झाला, त्यांनतर  पुन्हा 19 व्या शतकांत राजर्षी शाहू महाराजांना वेदोक्त प्रकरणात शुछ्र ठरवण्याचा प्रयत्न झाला. आणि आता 21 व्या शतकांत डॉ. खोले बाईंनी पुन्हा एका मराठा  समाजांच्या बाईला शुद्र ठरवण्याचा प्रयत्न केला. आपण सुवर्णांच्यादृष्टीने आजही शुद्रच आहोत, ही बाब लक्षात घेऊन समस्त बहूजन समांजानी या जरतीअंताच्या  विरोधात लढा व्यापक करण्याची गरज आहे.
खोले बाई तुमचा धर्माभिमान जर इतका जाज्वल असेल, तर तुम्ही प्रत्येक गोष्ट स्वनिर्मित वापरा. स्वता:च्या रोजच्या कपडयांपासून, ते अन्नापर्यंत प्रत्येक गोष्ट स्वत:  तयार करा. अन्यथा सोवळयातील बाई-माणसांकडून तयार केलेल्या वापरा, मात्र असे झाल्यास तुमचे जगणचं संपुष्टात येईल. कारण सोवळयातील तुम्हाला पुजारी  भेटेल, मात्र इतर वस्तूंसाठी तुम्हाला श्रमिकांकडे म्हणजेच बहूजन समाजाकडे हात पसरावे लागतील, हे तुम्ही सोयीस्करपणे विसरता का ? शोषित-पीडितांच्या  घामाने हा देश नटलेला आहे, तुमच्या सोवळयामुळे नव्हे. आणि तुमच्या सोवळयांनी या देशांच्या प्रगतीत काडीचेही योगदान नाही. उलट हजारो वर्षे गुलामीत  लोटण्याचे काम याच सोवळयांनी केले आहे, त्यामुळेच ब्रिटिश या देशांवर राज्य करू शकले, हे विसरू नका. त्यामुळे थोडे भानावर या. तुमच्या शिक्षणांच्या, पदव्यांचा  आणि अकलेची थोडी कीव येऊ द्या. आणि देशांची माफी मागून प्रायश्‍चित घ्या.
मोबाईल न. 9404006276