Breaking News

कोणाच्या जाण्याने काँग्रेसला फरक पडत नाही : आ. शरद रणपिसे

पुणे, दि. 22, सप्टेंबर - नारायण राणे काँग्रेस मधून बाहेर पडण्याचे कारण हे गटनेतापद असूच शकत नाही, कारण नारायण राणेंना मी स्वतः चार नंबरची जागा  दिली. त्यामुळे नारायण राणे यांनी काँग्रेसवर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. नारायण राणे यांनी आता दिल्या घरी सुखी राहावे असा सल्ला देत कोणी आले  काय अन् गेले काय, काँग्रेसला फरक पडत नाय अशा शब्दात आमदार शरद रणपिसे यांनी राणे यांच्यावर टीका केली. पुणे शहरात काँग्रेसचे नगरसेवक आबा बागुल  यांनी आयोजित केलेल्या नवरातौत्सव कार्यक्रमासाठी आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते.
मुख्यमंत्रीपदाचे आश्‍वासन देऊनही काँग्रेसने ते पाळले नसल्याचा आरोप करत तुम्ही काय माझी हकालपट्टी करता, मीच काँग्रेस सोडतो, अशा शब्दात नारायण राणे  यांनी अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली. यासोबतच राणेंनी विधान परिषदेच्या आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. विधानपरिषदेत गेल्यानंतर विरोधी पक्षनेत्याच्या  बाजूला मला बसायला जागा द्यायला पाहिजे होती. मी सिनियर असूनही मला गटनेता केले नाही. यासारखे आरोप करत राणे यांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी दिली.