Breaking News

दुर्घटनेला सरकार व रेल्वे प्रशासनच जबाबदार - आ. अबू आझमी

मुंबई, दि. 30, सप्टेंबर -  एल्फिन्स्टन स्थानकाच्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत झालेल्या मृत्यूंना सरकार व रेल्वे प्रशासनच जबाबदार आहे, अशी प्रतिक्रिया  समाजवादी पक्षाचे आ. अबू आसीम आझमी यांनी आज येथे व्यक्त केली . .
एल्फिन्स्टन स्थानकाचे नाव प्रभादेवी करण्यात आले. मात्र येथे वर्षानुवर्षे जुने पूल बदलण्यावर सरकार व प्रशासनाचे लक्ष नाही. यामुळेच आज 22 निरपराधांना  आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेची जबाबदारी सरकारने स्विकारली पाहिजे. जखमींवर उपचार करून चालणार नाही. एल्फिन्स्टन स्थानकाच्या आजूबाजूला  अनेक इमारती वाढल्या आहेत. येथील प्रवाशांची ये-जा वाढली आहे. अशा स्थितीत नवीन पूल होणे अपेक्षित होते. मात्र तो न होणे हे सरकारचे अपयश आहे.  सरकारने आपली चूक कबूल केली पाहिजे. मृतांच्या नातेवाईकांना रेल्वेत नोकरी व नुकसान भरपाई दिली पाहिजे, अशी मागणीही आ. आझमी यांनी केली.