जैन बांधवांकडून खा.राऊतांचा निषेध
अहमदनगर, दि. 01, सप्टेंबर - मिरजगांव येथील जैन बांधवांनी खासदार संजय राऊत यांचा निषेध केला.नुकत्याच झालेल्या मिरा भाईदर निवडणूका दरम्यान जैन मुनीनी राजकीय सहभाग घेऊन निवडणूक जिंकून दिल्या चा आरोप करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जैन समाजाचे धर्मगुरु नयन पद्मासागर यांच्या बद्दल अपशब्द काढले असुन त्यामुळे समस्त जैन बांधवांच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत. अहिंसा परम धर्म सांगणारे अहिंसावादी मुनीनवर खा.राऊत यांनी केलेल्या निंदनीय शब्दाचा वापर केल्याचा निषेध करीत खा.राऊत यांच्या वर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन पत्र मिरजगांव पोलिसांना देण्यात आले यावेळी मिरजगांव जैन संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र कासवा ,श्रीमल कोठारी ,राजु कोठारी ,विकास कटारिया ,प्रफुल्ल कोठारी ,दिपक कोठारी ,बाबु भंडारी ,महेश कोठारी ,मुन्ना भंडारी ,वैभव भंडारी आदी उपस्थित होते. तसेच मिरजगांव येथील जैन पार्श्वनाथ दिगांबर मंदिराचे अध्यक्ष संतोष गडकर ,उपाध्यक्ष सतीश धोंगडे, सुधीर रणदिवे ,महविर ढोले,पप्पु धोंगडे, रमेश एखंडे ,वर्धमान सिध्देश्वर ,अभिजित धोंगडे ,अशोक धोंगडे ,बापू धोंगडे यांनी ही खा.राऊत यांचा निषेध करत कारवाई करण्यात यावी याबाबत चे निवेदन दिले.