Breaking News

’झट मंगनी पट शादी’

डामडौल टाळून अवघ्या 3 तासांत उरकला लग्नसोहळा!

अहमदनगर, दि. 01, सप्टेंबर - तालुक्यातील बेलपिंपलगावचे पत्रकार विलास धनवटे यांचे बंधू कैलास धनवटे यांचा लग्नसोहळा कुठलाही डामडौल न करता  अनावश्यक खर्च टाळून अवघ्या तीन तासांत उरकण्यात आला. अत्यंत साध्या पद्धतीने दि. 27 रोजी सायंकाळी आठ वाजता हा सोहळा पार पडला. यामुळे  समाजासमोर एक वेगळा आदर्श राहिला असून लग्नात होणार्‍या अनाठायी खर्चावर आळा घालण्यासाठी अशा पद्धतीनेही लग्न करता येते, हेच यातून शिकायला मिळते.
नाशिक जिल्हयातील वणी येथील अनिल साखरे हे देवदर्शनासाठी श्री क्षेत्र  बेलपिंपलगाव येथील श्री. रोकडोबा हनुमान दर्शनासाठी परिवारसह आले होते. दरम्यान,  बेलपिंपलगाव येथील त्यांचे मामा प्रभाकर धनवटे व भावराव धनवटे यांच्याकड़े आल्यानंतर ख्याली खुशालीमध्ये लग्नाचा विषय निघाला. त्यावेळी मुलीच्या लग्नासाठी  इतरत्र मुलगा शोधण्याऐवजी आमच्या मुलाला तुमची मुलगी द्यावी, असा प्रस्ताव मांडण्यात आला  सर्व मंडआणि ळींनी त्यास सहमती दर्शविली. मुलाला मुलगी  दाखवली आणि मुलीला मुलगा दाखवला गेला, दोघाची पसंती  झाली, तारीख पाहून दिवाळीत लग्न करण्याचे ठरले. मात्र परंतु पत्रकार धनवटे यांनी यावेळी प्रस्ताव  मांडला, की मुहुर्त न पाहता अंधश्रद्धेवर विश्‍वास न ठेवता आजच लग्न समारंभ उरकून घेऊ. सर्वानी मनाचा मोठेपणा दाखवून तयारी दर्शवली आणि लगीनघाई सुरु  झाली. गावातील सामजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गटकळ, भावराव धनवटे यांनी व त्यांच्या सहकारी मित्रांनी अवघ्या तीन तासांत हा लग्नसोहळा पार पाडला,
भर पावसात येथील श्रीराम मंदिराच्या सभा मंडपात हा कार्यक्रम झाला. लग्नातला मानपान, रुसवे-फुगवे हे सारे बाजूला ठेवून पार पडलेल्या या लग्नसोहळ्यास माजी  सभापती दिगंबर शिंदे, सामजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गटकळ, उपसरपंच दीपक चौगुले, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, अनंत धनवटे, उपाध्यक्ष सुभाष  साठे, माजी सरपंच राजेंद्र साठे,  पोलिस पाटील संजय साठे, माजी सभापती वसंत रोटे, दूध संघाचे संचालक वसंत शेरकर, सुनील हापसे, हनुमान पतसंस्थेचे  अध्यक्ष कल्याण शिंदे, माजी चेअरमन भीमजी साठे, मिलिंद खटके, अरुण वरघुडे, गणेश बोखारे, रामेश्‍वर धनवटे लहुजी सेना अध्यक्ष बाळासाहेब शेंडगे, पत्रकार  मंगेश कदम, पत्रकार विजय भंडारी, पत्रकार प्रतिक सुरसे, पत्रकार गणेश दारकुंडे, अमोल धनवटे, आदींसह शिवप्रेमी प्रतिष्ठान, स्वराज मित्र मंडळ, डॉ बाबासाहेब  आंबेडकर मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांसह गावातील अनेकांनी या आगळ्यावेगळ्या लग्नसोहळ्यास हजेरी लावून वधू-वरांना अक्षदारूपी आशिर्वाद दिले.