Breaking News

संगमनेरात डिजेवर कारवाई, पाच जणांना अटक

.संगमनेर, दि. 01 (प्रतिनिधी):- शहरातील नगरपालिका परिसर व शासकीय कार्यलय आवारात डिजे अथवा मोठ्या आवाजात वाद्य वाजविण्यास बंदी असतानाही,  सुर्या अ‍ॅकेडमीच्या गणेश विसर्जन मिरवणूकीत डाजे लावण्यात आला. यामुळे न्यायालयीन कामकाजीत अडथळा निर्माण झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधिशाने वाद्य  वाजविणार्‍यांचे साहित्य जप्त करून कारवाई करावे, असे आदेश शहर पोलिसांना दिले. यावरून वाद्य वाजविणार्‍याचे साहित्य जप्त करत 5 जणांवर पोलिसांनी गुन्हा  दाखल केला आहे. हि घटना मंंगळवारी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास पालिका परिसरात घडली. यामुळे डिजे चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
या बाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुर्या अ‍ॅकेडमीच्या गणेश विसर्जनाची मंगळवारी मिरवणुक होती. ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून जात  असताना ती पालिकेच्या प्रांगणात असलेल्या जिल्हा व सत्र न्यायालयाजवळ आली. मिरवणूकीत असलेल्या वाद्याचा मोठा आवाज येत असल्याने न्यायालयीन  प्रक्रीयेत अडथळे निर्माण होत होते. आवाजाने परेशान झालेल्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधिशाने वाद्य चालक व आयोजकांवर साहित्य जप्त करून  कारवाईचे आदेश शहर पोलिसांना दिले. पोलिसांनी लागलीच कारवाई करत 11 स्पिकर असलेला टॅम्पो ताब्यात घेतला. तर न्यायालयाचे कर्मचारी सतिष मच्छिंद्र  सरवदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आण्णासाहेब सुदाम काकड, तुषार सुभाष कैचे, वेभव विठ्ठल काकड, भारत भाऊसाहेब आगलावे, दिलीप दावल सोनवणे आदी  पाच जणांवर पर्यावर संरक्षण कायदा व शासकीय अधिकार्‍यांनी कर्णकर्कश आवाजावर घातलेल्या बंदीचे पालन न केल्याचा गुन्हा दाखल करून पाच जणांना  साहित्यासह ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पो. नि. गोविंद ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस करीत आहेत.कर्णकर्कश वाद्य चालकावर कारवाई  झाल्याने वाद्य चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.