Breaking News

नोकरीचे अमिष दाखवून तरुणांची फसवणुक करणा-यास अटक

औरंगाबाद, दि. 30, सप्टेंबर -  वर्तमानपत्रात जाहिरात देवून स्पर्श हेल्थ कॅम्पमध्ये नोकरीचे अमिष दाखवून अनेक तरुणांची फसवणुक करणार्या एका झारखंड  मधील युवकास पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून एक लाख रूपये आणि अनेक कागदपत्रही जप्त करण्यात आली आहेत.
दिलीप गुप्ता याने वर्तमान पत्रात जाहिरात दिली होती त्यात स्पर्श या संस्थेसाठी पंचायतीसाठी सर्वेअर, तालुक्यामध्ये बीपीओ, नर्स, कम्पाऊंडर, लॅब टेक्नीशियन  अशी पदे भरायची असल्याचे म्हटले होते. या साठी त्याने मध्यवर्ती भागात कार्यालयही थाटले आणि संस्थेत कामासाठी भरती करण्यासाठी तरूणांकडून एक एक  हजार रूपये घेतले.मात्र या बाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर धाड टाकून पोलिसांनी चौकशी केली असता त्याचे बिंग उघडे पडले. मोबाईल,रोख रक्कम,लॅपटॉप  बनावट नेमणुक प्रमाणपत्र, विविध बँकांचे धनादेश बुक, एटीएम कार्ड, आणि इतर साहित्य असा सुमारे 1 लाख रूपयांचा ऐवज जप्त केला असून दिलीप गुप्ताला  अटक केली आहे.