Breaking News

केंद्रीय क्रीडामंत्री गोयल यांच्या हस्ते सिंधू, सायनाचा सन्मान !

नवी दिल्ली, दि. 01, सप्टेंबर - केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी आज पी.व्ही.सिंधु, सायना नेहवाल,किदांबी श्रीकांत, प्रशिक्षक पुलेला गोपीचंद आणि विमल  कुमार यांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित केले. 
भारताची किर्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणा-या खेळाडूंचा सन्मान करतांना मला आनंद होत असल्याचे गोयल यांनी सांगितले. देशातील नवोदित खेळाडूंपुढे सिंधू,  सायना आणि श्रीकांत यांचा आदर्श आहे . सायना आणि सिंधू या दोघी सचिन तेंडुलकर आणि अन्य प्रसिद्ध खेळाडूंएवढ्याच मेहनत करुन देशाचे नाव उंचावत  आहेत. सिंधू आणि सायनाने जागतिक चॅम्पियनशीपमध्ये देशासाठी पदक मिळविल्यामुळे बॅटमिंटन स्पर्धेमध्ये आपले जागतिक स्तरावर नाव कोरले गेले आहे असेही ते  म्हणाले.