Breaking News

’सीबीआय’ चे माजी प्रमुख राघवन यांची सायप्रसच्या उच्चायुक्तपदी नियुक्ती

नवी दिल्ली, दि. 01, सप्टेंबर - केंद्रीय अन्वेषण विभागाचे माजी प्रमुख आर.के. राघवन यांची मोदी सरकारने सायप्रस मधील भारतीय वकिलातीच्या उच्चायुक्तपदी  नियुक्ती केली आहे. . 
76 वर्षींय राघवन 1990 ते एप्रिल 2001 दरम्यान अन्वेषण विभागाच्या संचालकपदी कार्यरत होते. 2002 च्या गुजरात दंगलीच्या तपासाची जबाबदारी राघवन  यांच्याकडे सोपवण्यात आली होती. संपूर्ण चौकशी केल्यानंतर राघवन यांनी मोदी यांना क्लीनचिट दिली होती. 2008 मध्ये सर्वोच्च न्यायालयामार्फत ग्रोधा दंगलीचा  तपास करणार्‍या विशेष तपास पथकाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी राघवन यांच्याकडे सोपवण्यात आली होती. या दंगलीत मोदी यांचा हात असल्याचे कोणतेच पुरावे  सापडले नाहीत, असे स्पष्टीकरण 2012 मध्ये विशेष तपास पथकाने न्यायालयात दिले होते.