Breaking News

एल्फिन्स्टन : चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे रेल्वे मंत्री गोयल यांचा नियोजित कार्यक्रम रद्द


मुंबर्इ, २९ सप्टेंबर, : एल्फिन्स्टन आणि परळ स्थानकांना जोडणा-या पूलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेनंतर रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांचा नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. हार्बर व ट्रान्सहार्बर मार्गावरील अतिरिक्त सेवांना हिरवा झेंडा दाखवण्यासाठी रेल्वे मंत्री गोयल आज मुंबर्इत आले होते. २ ऑक्टोबरपासून हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर २८ अतिरिक्त सेवा देण्यात येणार असून रेल्वे मंत्री आज व्हिडिओ लिंकद्वारे शुभारंभ करणार होते. मात्र,चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे त्यांनी हा कार्यक्रम रद्द केला.