Breaking News

डॉ. श्रीपाल सबनीसांना पुन्हा धमकीचे पत्र


पुणे , २९ सप्टेंबर
 : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांना पुन्हा एकदा धमकीचे निनावी पत्र आले आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात येणार आहे. यापूर्वी त्यांच्या सभेस दोन पोलीस कर्मचारी उपस्थित राहत होते. आता त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला तीन पोलीस कर्मचारी उपस्थित राहत आहेत. पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या साहित्य संमेलनादरम्यान डॉ. सबनीस यांना पोलीस संरक्षण पुरविण्यात आले. त्यांच्यासोबत कायम दोन पोलीस कर्मचारी ठेवले गेले होते.