Breaking News

दारणा नदीत सेल्फी घेतांना तोल जाऊन तरुणाचा मृत्यू

नाशिक, दि. 06, सप्टेंबर - नाशिकमध्ये गणेश विसर्जनाला गालबोट लागले आहे. नाशिकमध्ये गणेश विसर्जनासाठी आलेल्या मुलाचा विसर्जनादरम्यान सेल्फी घेत  असताना तोल जाऊन दारणा नदीच्या पात्रात पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना दुपारी 2 च्या सुमारास घडली. किशोर सोनार वय  23 वर्षीय असे तरुणाचे नाव आहे अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. किशोर हा नाशिकमधील चेहेडी परिसरात राहत होता. आई-वडिलांसोबत तो विसर्जनासाठी  आला होता.