Breaking News

सैन्यात भरती झालेल्या अमोलची आत्महत्या

हिंगोली, दि. 06, सप्टेंबर - सैन्यात भरती झालेल्या 19 वर्षीय अमोल नामदेव पतंगे यानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हिंगोली जिल्हयातील  कळमनुरी तालुक्यातील मौजे कामठा येथील रहिवासी असलेला तरुण अमोल नामदेव पतंगे (वय 19 वर्षे) हा तरूण नुकताच सैन्यात भरती झाला होता. त्याने काल  औरंगाबादेत जावून कागदपत्रं जमा केली. रात्री कामठयाला परतला. थोडा वेळ तो टी.व्ही पाहत बसला होता.सकाळी त्याने त्याच्या खोलीत आत्महत्त्या केल्याचे  पालकांना लक्षात आले.
पालकांनी त्याला जवळच्या ग्रामीण रूग्णालयात नेले तेंव्हा त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याची आई, वडील, भाऊ, बहीण सारे यामुळे गर्भगळीत झाले  असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.