अहमदनगर, दि. 01, सप्टेंबर - राजकीय स्पर्धा व डीजेमुळे नगरचा गणेश ऊत्सव लोप पावत चालला आहे. नगर शहरातील गणेश उत्सवातील सध्याच्या वातावरणामुळे उत्सव संस्कृती सोडून साजरा केला जात आहे. राजकीय शक्ती वाढण्याचे प्रकार वाढले आहेत . हा उत्सव राजकीय व्यासपीठ न होता सामाजिक उत्सवा व्हावा असे वाटते गणेशो त्सवातून जडणघडण होत असली तरी उत्सवात राजकारण नसते राजकारण आणि समाजकारण या दोन गोष्टी वेगळ्या आहेत . उत्सवातून मराठी संस्कृती जपली पाहिजे . पारंपरिक वाद्याने व जुन्या पारंपरिक कार्यक्रमाने मंडळ व मिरवणुकीत बघण्यासाठी गर्दी होऊ शकते . मंडळांनी डीजेचा हट्ट धरू नये , मात्र सध्या डीजे (सीडी ) कोठून आणायचा , किती थप्पीचा लावायचा , त्याचा आवाज किती असेल ,देखावा कसा असेल याची स्पर्धा सुरु झाली आहे . सामाजिक काम व पौराणिक ,ऐतिहासिक ,धार्मिक देखावेसाठी स्पर्धा असली पाहिजे . मात्र यासाठी कोठेच स्पर्धा दिसत नाही त्यामुळे नगर शहराला परंपरा असलेला गणेश उत्सव व विसर्जन मिरवणूक तसेच संस्कृती लोप पावत चालली आहे वर्गणीमुळे उत्सव खर्चावर मर्यादा आली आहे . त्यामुळे मंडळांनी दोन तीन मंडळे मिळून एकच मंडळ स्थापन करून गणेशाची प्रतिष्ठापना करावी उत्सवापुरतेच सामाजिक काम न करता ते कायमस्वरूपी असावे . यासाठी शिव वरदगणेश मंडळाने 20 वर्षांपूर्वीच प्रतिष्ठान स्थापन करून कायमस्वरूपी उपक्रम राबविले जात आहे . यात आधुनिक जिम मोफत , दवाखाना , रुग्णवाहिका हि सुरु केली आहे कचर्याच्या विल्हेवाटीसाठी नागरिकांना डस्ट बिन दिल्या आहेत मोफत वाचनालय असे सामाजिक कामाबरोबरच शैक्षणिक उपक्रमही सुरु असता
किशोर डागवाले भाजप शहर जिल्हा उपाध्यक्ष नगर