Breaking News

संगमनेरात मटका अड्ड्यावर छापे; दोघांना अटक

अहमदनगर, दि. 22, सप्टेंबर - शहर व परिसरात मटका व्यवसाय खुलेआम सुरु असल्याचे चित्र आहे. या व्यवसायातून दररोज तब्बल 40 लाख रुपयांपेक्षाही  अधिक रुपयांची उलाढाल होत आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने बाहेरील तालुक्यातील मटका व्यावसायिकही संगमनेर शहरात येऊन व्यवसाय करीत  आहेत. या व्यवसायामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येवू लागली आहे. यामुळे नागरीक संतप्त झाले आहेत. येथे मटका व्यवसाय अतिशय जूना आहे.  बेकायदेशीरपणे चालणार्‍या या व्यवसायातून काही मटकाकींग मालामाल झाले आहे. संगमनेरात सध्या दोघे जण हा व्यवसाय चालवतात. शहरातील अनेक ठिकाणी हा  व्यवसाय चालतो. 30 रुपयात 450 रुपये मिळतात, या आशेने अनेक जण मटका खेळतात. काही जणांनाच पैसे मिळतात. मात्र हा व्यवसाय  करणार्‍यांना दररोज  लाखो रुपये मिळतात. दरम्यान,  शहरात मंगळवारी दि.20 शहर पोलिसांकडून दोन मटका अड्ड्यावर छापा मारण्यात आला. खबर्‍याकडून माहिती मिळताच  संगमनेर शहर पोलिसांनी आरगडे गल्ली, शारदा बेकरी जवळ तसेच संगमनेर बस स्थानक जवळ दोन ठिकाणी छापा मारून दोन जणांना कल्याण मुंबई मटका  खेळवतांना अटक करण्यात आली. त्यात विजय भगवंत गोरडे याच्याजवळ  1 हजार 970 रुपये रोख व कल्याण मटक्याचे बुक जप्त करण्यात आले.