Breaking News

बालंबिका देवी मंदिरात ज्योतीचे स्वागत

अहमदनगर, दि. 22, सप्टेंबर - बालमटाकळी येथिल ग्रामदैवत श्री बालंबीका देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवानिम्मित्त श्री क्षेत्र पद्मावती माता तिरुपती बालाजी  येथून शेकडो भाविकांनी आणलेल्या ज्योतीचे भाविक भक्त व ग्रामस्थांनी अत्यंत भक्तमय वातावरणात स्वागत करण्यात आले त्यानंतर घटस्थापना करण्यात आली. 
बालमटाकळी येथील बालंबीका देवीच्या मंदिरात सालाबाद प्रमाणे शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो यंदा श्री क्षेत्र पद्मावती माता तिरुपती बालाजी येथून  शेकडो भाविकांनी आणलेल्या ज्योतिचे गुरवारी सकाळी भव्य स्वागत करून गावातून टाळ मृदुंग व लेझीम पथकासह मिरवणूक काढण्यात आली ज्योत आणण्यासाठी  गेलेल्या भाविकांनी भगवे फेटे परिधान केले होते मंदिरात ज्योत गेल्यानंतर विधिवत पूजा करून घटस्थापना करून नवरात्र उत्सवास प्रारंभ करण्यात आला यावेळी  भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.नवरात्र महोत्सवात दररोज सकाळी सात ते दहा हभप अशोक शिंदे यांचे ज्ञानेश्‍वरी पारायण, व सायंकाळी 9 ते 11 रोजी  हभप विजू महाराज सुलाखे यांचे गीत रामायण तर सोमवार दि 20 रोजी अभिनेते राहुल सोलापूरकर यांचे शिवचरित्रावर व्याख्यान बरोबर विविध धार्मिक कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले आहे.