Breaking News

सौताडा घाटात मालट्रक कोसळला

अहमदनगर, दि. 22, सप्टेंबर - जामखेड बीड रोडवरील सौताडा घाटात आज दि. 21  दुपारी मालट्रकचे ब्रेक फेल झाल्याने ट्रक घाटात कोसळला. यावेळी  प्रसंगावधान राखून ड्रायव्हर व क्लिनर यांनी चालू गाडीतून उड्या मारल्याने त्यांचे प्राण वाचले. विठ्ठल सकडे व वैजिनाथ सकूडे रा.सकनवाडी. ता.  पाटोदा. जि.  बीड  हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  
सिमेंट गोण्यांनी भरलेला हा मालट्रक परळी येथून अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे सिमेंट घेऊन चालला होता. सदर चा ट्रक हा दुपारी साडेतीन वाजण्याच्या  सुमारास जामखेड जवळील जामखेड बीड रोडवरील सौताडा घाटात आला असता घाटातील रोडवर पडलेल्या मोठ्या खड्यामुळे गाडीचे चाके या खड्यात गेल्याने  ट्रकचे ब्रेक फेल झाले.  ही बाब गाडीचा ड्रायव्हरच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने चालत्या ट्रक मधून खाली उड्या मारल्या. सुदैवाने या अपघातात जीवितहानी  झाली नाही. जखमींना आपल्या वाहनातून पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यासाठी अण्णासाहेब सावंत, प्रविण बोलभट, विष्णू गंभीरे,  अनिल डोके यांनी पुढाकार घेतला.