Breaking News

काँग्रेस तालुकाध्यक्ष पदासाठी निरीक्षक

30 पर्यंत जिल्हाध्यक्ष निवड; विखे-थोरात गट आमने-सामने

अहमदनगर, दि. 22, सप्टेंबर - जिल्हातंर्गत निवडीसाठी काँग्रेस सज्ज झाली असून पक्षाने तालुका अध्यक्ष निवडीसाठी 18 निरीक्षकांची नियुक्ती केली  आहे. 
जिल्हाध्यक्षपदासाठी बिहारमधील आमदार अमिता  भूषण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. निवडीच्या निमित्ताने का होईना, पक्षातील मरगळ क
मी होईल असे दिसते. तालुकाध्यक्षांची निवड 25 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करायची असून जिल्हाध्यक्षपदासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
यावर्षी प्रथमच काँग्रेसने जिल्हाध्यक्ष व तालुकानिहाय निवडीसाठी इतर जिल्ह्यातील निरीक्षकांना आणले आहे. जिल्हाध्यक्ष निवडीसाठी इतर राज्यातील
निरीक्षक नेमण्यात आले आहे.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुका अध्यक्षाची निवडीसाठी जिल्ह्यात 17 निरीक्षक निुयक्त करण्यात आले असून   जिल्हाध्यक्षपदासाठी निरीक्षक म्हणून आमदार अमिता भूषण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्षाच्या निवडीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर
असली तरी त्याच्या अगोदरही निवड होऊ शकते किंवा नंतरही निवड प्रक्रिया होऊ शकते असे सांगितले.पक्षात गटबाजी नसल्याने अडचणी नाहीत, असे ससाणे  म्हणाले.
मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाध्यक्षपदासाठी आमदार डॉ. सुधीर तांबे, अण्णासाहेब म्हस्के, प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, राजेंद्र नागवडे, अण्णा शेलार  प्रामुख्याने इच्छुक  आहेत. नावावरून विखे-थोरात गट सक्रीय झालेल्या दिसतात. दुसरीकडे विद्यमान जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनीही आपले पत्ते उघड केलेले  नाहीत. त्यामुळे इच्छुकांमध्ये तेही असू शकतात, असे काही कार्यकर्त्यांच म्हणने आहे. तुर्तात तरी विखे-थोरत असा संघर्ष पुन्हा उडण्याची शक्यता आहे.