Breaking News

रामदास आठवले यांचे रविवारी चैत्यभूमीवर स्वच्छता अभियान

मुंबई, दि. 24, सप्टेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारद्वारे सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता ही सेवा या सप्ताहानिमित्त रिपब्लिकन  पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या सकाळी 11.30 वाजता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी परिसर  येथे स्वच्छता अभियान राबविणार आहेत. चैत्यभूमी परिसर स्वच्छता मोहिमेत आठवले स्वतः सहभागी होऊन स्वच्छता करणार आहेत. या मोहिमेत इच्छुकांनी  उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.