Breaking News

घाटकोपरमध्ये पोटमाळा कोसळून 10 जण जखमी

मुंबई, दि. 24, सप्टेंबर - घाटकोपरमध्ये गोळीबार रोडवरील एका घरातील पोटमाळा कोसळून 10 जण जखमी झाले. जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल  करण्यात आले आहे. जखमींमधील सहा जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर चार जणांवर अद्याप उपचार सुरु असल्याचे डॉक्टरांनी  सांगितले. 
येथील पोटमाळ्यावर बाजीराव सकपाळ हे भाड्याने राहत होते. त्यांचा मुलगा सुजल सकपाळ याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पंधरा ते वीस जण पोटमाळ्यावर  जमले होते . त्यांच्या वजनाने अचानक हा पोटमाळा खाली आला. खाली असलेले दुकान बंद असल्यामुळे जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन  दल, पोलीस आणि पालिका आपत्कालीन विभागाचे कर्मचारी घटनस्थळी दाखल झाले होते.