Breaking News

सरकार वाड्यातील श्री सिध्दीविनायक

अहमदनगर, दि. 01, सप्टेंबर - नगर शहरातील सरकार वाड्याजवळ (नगर अर्बन रोड) असलेले श्री सिध्दीविनायक मंदिर नगरच्या अष्टविनायकांपैकी एक मानले  जाते.मंदिराची आणि सभोवतीच्या वाड्याची वास्तू पुरातनतेची साक्ष देत असले तरी मंदिर निर्मितीचा निश्‍चित कालावधी उपलब्ध नसल्याचे समोर येते.मुख्य प्रवेशद्वार  दगडी बांधणीमधील असून प्रवेशद्वारालगतची दगडी बांधणी मजबूत दिसते.दोन्ही बाजूस दिवे ठेवण्यासाठी सुबक देवळ्या आहेत.सभामंडपाच्या मध्यभागी मंदिराचा  गाभारा असून तो 2 बाय 4 आकारातील आहे.उत्तराभिमुख असलेल्या गाभार्‍यातील गणेशाची बैठी मूर्ती आहे.असे असले तरी टी तांडव करताना दिसायची.कालांतराने  या ठिकाणी नवीन संगमरवरी मूर्ती विधिवत स्थापन केली.या दोन्ही मुर्त्या उजव्या सोंडेच्या आहेत.नवीन मूर्ती स्थापित केल्यानंतर जुनी मूर्ती मंदिराच्या पाठीमागे  जाताना करून ठेवली आहे. संगमरवरी नविन मूर्तीच्या तिन हातात आयुधे व एका हातात मोदक आहे. गणपतीने एका पायाची मांडी घालून दुसरा पाय उभा ठेवलेला  दिसतो. या मुर्तीवर असलेले अंगभुत जानवे नागाच्या प्रतिकृतीचे असुन गणपतीच्या सोडेंखाली नाग फणी पहावयास मिळते. हा उजव्या सोंडेचा वैशिष्ठ्यपुर्ण गणपती  नित्यदर्शन घेणार्‍या भाविकांच्या मनोकामना पुर्ण करतो अशी भाविकांची श्रध्दा आहे. गेल्या 35 वर्षापासून विनाखंड मंदिराच्या व्यवस्थापनासाह पुजेची सेवा श्री सुभाष  वैद्य निष्ठेने करतात.