Breaking News

मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने ’नॅशनल रिसर्च प्रोफेसर’ पुरस्कारांचे सोमवारी वितरण

औरंगाबाद, दि. 03, सप्टेंबर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने डॉ.महेंद्र सिरसाठ, डॉ.के.एम.जाधव, डॉ.रामफल शर्मा (प्राणीशास्त्र विभाग)  डॉ.सी.एच.गील, डॉ.बापू शिंगटे (रसायनशास्त्र विभाग), डॉ.के.व्ही.काळे (संगणकशास्त्र विभाग), डॉ.वैशाली खापर्डे (ग्रंथालयशास्त्र विभाग), डॉ.अनिकेत सरकटे  (रसायनतंत्रज्ञान विभाग) यांचा नॅशनल रिसर्च प्रोफेसर अ‍ॅवार्ड देवून सोमवारी गौरव करण्यात येणार आहे. उत्कृष्ट संशोधन करणार्यांना हा पुरस्कार दिला जातो. ज्येष्ठ  शास्त्रज्ञ डॉ.पी.के.अस्वाल संचालक नॅशनल फिजिझक्स नवी दिल्ली लॅबोरेटी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येईल. कुलगुरु डॉ.बी.ए.चोपडे अध्यक्षस्थानी  राहणार आहेत. महात्मा फुले सभागृहात सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात विशेष कार्यसन अधिकारी डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव  डॉ.प्रदीप जब्दे यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी कार्यक्रमास उपस्थिती राहण्याचे आवाहन विद्यार्थी विकास संचालक डॉ.मुस्तजिब खान यांनी केले आहे.