Breaking News

कास पठारावरील पुष्पप्रजातींवर संशोधनासाठी कोणालाही परवानगी नाही

सातारा, दि. 28, सप्टेंबर - कास पठार हे जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्को (UNESCO) ने जुलै 2012 मध्ये घोषित केले आहे. कास पठारावर एकुण 850  पेक्षा जास्त प्रजातींच्या वनस्पती आढळतात. यामध्ये प्रादेशिक व अतिदुर्मिळ वनस्पतींचा समावेश आहे. रेड डाटा बुकमधील 624 प्रजाती पैकी 39 प्रजाती कास  पठारावर आढळतात. कास पठारावर दरवर्षी जुलै ते ऑक्टोंबर या महिन्यांमध्ये दर 15 ते 20 दिवसांनी विविध रंगीबेरंगी पुष्प प्रजातींच्या जीवनक्रम बदलत असतो.  त्यातील प्रदेशिनिष्ठ व अतिदुर्मीळ वनस्पती ह्या कास पठारावरील एकठिकाणाहुन दुसरीकडे स्थलांतरीत करुन पठारावरच पुर्नलागवड केल्यातरीही स्थापित होत  नाहीत. त्यामुळे कास पठारावरील पुष्पप्रजातींवर संशोधनासाठी वनविभागा मार्फत कोणालाही परवानगी देण्यात आली नाही किंवा कोणी संशोधनासाठी वनविभाकडे  परवानगी मागीतली नाही.
तसेच भविष्यातही परवानगी देण्याचा प्रस्ताव नाही. फक्त वनस्पतींच्या आहे त्या जागेवर अभ्यास करण्यासाठी मर्यादित स्वरुपात अभ्यासकांना परवानगी देणेत येते.  वनस्पतींची फुले वा इतर अवयव तोडणे, उपटणे किंवा इतरत्र स्थलांतरित करणे ह्यासाठी वनविभाकडफन परवानगी देणेत येत नाही. असे गैर प्रकार केल्यास  वनविभागाकडुन उपद्रव शुल्क आकारले जाते अशी माहिती उपवनसंरक्षक अ. मो. अंजनकर यांनी दिली आहे.