Breaking News

महिलेवर सहा महिने बलात्कार करणार्‍या दोघांना अटक

रत्नागिरी, दि. 28, सप्टेंबर - शीर (ता. गुहागर) येथील 41 वर्षीय महिलेने गावातील दोघेजण सहा मिहिने बलात्कार करत असल्याची तक्रार गुहागर पोलिस  ठाण्यात दाखल केली आहे. वैभव सीताराम ठोंबरे व शिवराम हरी आंबेकर या दोघांनी गेल्या जानेवारीपासून जूनपर्यंत बलात्कार केल्याचे पीडित महिलेने तक्रारीत  म्हटले आहे. 
गुहागर पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनुसार वैभव सीताराम ठोंबरे याने पीडित महिलेकडून 27 हजार रुपये उसने घेतले होते. ते परत देण्याच्या बहाण्याने त्याने  महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर शिवराम हरी आंबेकर यांनीही पैशाची मागणी केली होती. परंतु त्याला त्या महिलेने पैसे दिले नाहीत, म्हणून त्यानेही बलात्कार  केला. गुहागर पोलिसांनी दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे.